यु जी सी चे धोरणविरुद्ध ए. आय. एस. एफ. चे अक्युपाय यूजीसी आंदोलन

अक्युपाय यूजीसी आंदोलनात कॉ. शंबुक चौधरी जखमी. भाकपची पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी



भाजपचे मोदी सरकार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन च्या दबावाला बळी पडून यूजीसी च्या धोरणात बादल करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे एम. फील, पी.एच. डी करू इछिणार्‍या विद्यार्थ्यांना पूर्वी ज्या सवलती मिळत होत्या त्यावर गंडांतर येणार आहे. शिक्षणाचे बाजारीकरण आणि परदेशी विद्यापीठांचा मुक्त संचार या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात होण्याचा धोका ओळखून ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ने यूजीसी च्या धोरणाला तीव्र विरोध करून हे धोरण सरकारने मागे घ्यावे म्हणून दिल्ली च्या जंतर मंतर वर आंदोलन ६ डिसेंबर २०१५ पासून सुरू केले आहे. दिनांक ९ डिसेंबर २०१५ रोजी संसदेवर मार्च काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ने शांततेत केला परंतु मोदी सरकारच्या दिल्ली येथील पोलिस यंत्रणेने आंदोलन दडपण्याच्या उद्देशाने मोर्चेकर्‍यांवर अचानक पाण्याचा मारा केला. तरी विद्यार्थी आपल्या मागण्यासाठी अटळ राहून पुढे निघाले असता लाठीमार सुरू केला. या लाठीमारात महाराष्ट्रातील ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे उपाध्यक्ष कॉ. शंबुक उदय चौधरी गंभीररित्या जखमी झाले. त्याचा कपाळावर पोलिसांनी केलेल्या अतिरेकी हल्यात जखम झाली. एव्हढेच नव्हे तर त्याच्या पाठीवर, पायावर जोरात मार दिला. एव्हढे होवूनही विद्यार्थी मागे सरकत नाही हे पाहून दिल्ली पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकंडया फोडल्या ती नळकांडी एका विद्यार्ठींनीच्या छातीवर जाणूनबुजून पोलिसांनी फेकली. विद्यार्थिंनींच्या गूप्तांगावर सुद्धा लाठीमार केला. या अनन्वित अत्याचाराचा निषेध भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे. आणि आंदोलन हाताळणार्‍या पोलिस अधिकारी आणि ड्यूटीवरील अन्याय करणार्‍या पोलिसांचे निलंबांनाची मागणी करत आहे. कॉ. अपराजिता राजा, दिल्ली युंनिव्हार्सिटी स्टुडंट यूनियन चे अध्यक्ष कॉ. कन्हैया कुमार , कॉ. अंशू कुमार, कॉ. अनुभूति कॉ. अमृता पाठक, पंजाबचे विद्यार्थी कॉमरेड्स आदींसह ४५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या सर्वांना राम मनोहर लोहिया हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले आहे. दिल्ली पोलिसांवर सदोष मनुष्यवध करण्याच्या हेतूने केलेल्या हल्याबद्दल रितसर केस दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी केस दाखल करून घेतली नाही. कॉ. शंबुकच्या कपाळावर पाच टके पडले असून पायावर मार बसल्यामुळे त्यावर उपचार चालू आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थिनिवर पुरुष पोलिसांनी लाठीमार केला आहे. महिला पोलिस उपलब्ध असताना पुरुष पोलिसांनी विद्यार्थिनिवर हल्ला केल्यामुळे मोदी सरकारचा आंदोलन चिरडण्याचा उद्देश समोर आला आहे.


पुन्हा मुख्य पानावर