कॉ. नारायण घागरेंना श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

कॉ. नारायण घागरे

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कौन्सिल चे सहसेक्रेटरी कॉ. नारायण घागरे यांचे निधन ३ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी नगरसेवक होते. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अत्यंत लढावू कार्यकर्ते आणि नेते होते. त्यांचा जन्म कामगार कुटुंबात झाला होता. त्यांची आई गिरणी कामगार होती.गिरणी कामगारांवर होणारा अन्याय त्यांना सहन होत नव्हता. ऑल इंडिया युथ फेरडेरेशन चे त्यांनी राज्य अध्यक्ष म्हणून काम केले. युवकांसाठी त्यांनी वेगवेगळे लढे उभारले,त्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला.१९६५ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. त्यांनी परिसरातील लोकांची सावकारी पाशातून मुक्तता व्हावी म्हणून श्रमिक एकता क्रेडिट को-ऑप पतपेढीची स्थापना केली. या पतपेढीचे ते संस्थापक अध्यक्ष होते.त्यांनी विविध जबाबदर्‍या लीलया पेलल्या. लाल बावटा मजदूर यूनियन चे अध्यक्ष,गिरणी कामगार यूनियन चे पदाधिकारी,ब्रहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे अध्यक्ष,मुंबई जिल्हा कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले. भाववाढ,गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी तुरुंगवास भोगला. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाल्यामुळे पक्षाची हानी झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष घागरे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली