कॉ.ए.बी.बर्धन यांचे शोचनीय निधन

भाकप चे जेष्ठ नेते डाव्या विचाराचे पितामह कॉ.ए.बी.बर्धन यांचे शोचनीय निधनभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ. ए. बी. बर्धन यांना ७ डिसेंबर २०१५ रोजी सकाळीच जी. बी. पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवून पुन्हा चळवळीत योगदान देतील अशी आशा होती परंतु २ जानेवारी २०१६ रोजी संध्याकाळी ८.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॉ. बर्धन यांचे नाव अर्धेंदु भूषण बर्धन परंतु त्यांना भाई बर्धन याच नावाने संबोधले जायचे. ते खरोखरच भाई होते सामान्य जनतेचे. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२५ चा. सिल्हेट इथे त्यांचा जन्म झाला. जे सिल्हेट आज बांगलादेशात आहे. नागपुर युनिव्हर्सिटीत शिकत असताना ते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मध्ये १९४० ला सामील झाले. आणि त्याच काळी ते कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले जेंव्हा इंग्रज सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. १९४५ मध्ये ते ए आय एस एफ चे राष्ट्रीय सचिव निवडले गेले. १९४१ साली त्यांनी घर सोडून पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. विद्यार्थी चळवळीत नंतर त्यांनी कामगार चळवळीला वाहून घेतले. वस्त्रोद्योग कामगार, संरक्षण कामगार, वीज कामगार विमा कामगार, रेल्वे कामगार यांच्या संघटना बांधून कामगारांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच राहिला.साम्यवादी समाजवादावर त्यांची अखंड निष्ठा होती. जाती धर्माच्या नावावर फुट पाडून राजकारण करणारे समतेच्या राजकरणास घातक आहेत हे ते जाणून होते. धर्मनिरपेक्षतेवर त्यांचा विश्वास होता. आपल्या अमोघ आणि फरड्या वाणीतून त्यांनी प्रबोधन केले. त्यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात ही भाग घेतला होता त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

१९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून आमदार म्हणून आले. त्यांनी पक्षाच्या विविध पदावर काम केले. १९६८ ला पक्षच्या राष्ट्रीय कौन्सिल व्हीआर निवडले गेले १९८२ ला सचिव मंडळात निवड,१९९५ साली डेप्युटी जनरल सेक्रेटरी,आणि ऑगस्ट १९९६ साली पक्षाचे जनरल सेक्रेटरी झाले ते २०१२ पर्यन्त त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. त्यांचे निधनाने भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांनी जाणीवपूर्वक नवे नेतृत्व तयार केले. दूरदर्शी पणा हा त्यांचा स्थायीभाव राहिल्यामुळे राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय धोरण राबवताना काय भूमिका घ्यावी याचे त्यांनी कार्यकर्त्यांना शिक्षा दिले त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी वाटत असली तरी त्यांच्या ध्येयधोरणाचा पक्ष वाटचाल करील हीच त्यांना खरी श्रद्धांजली. हीच खरी आदरांजली .......पुन्हा मुख्य पानावर