कॉ.ए.बी.बर्धन दवाखान्यात दाखल

भाकप चे जेष्ठ नेते कॉ.ए.बी.बर्धन दवाखान्यात दाखलभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ. ए. बी. बर्धन यांना ७ डिसेंबर २०१५ रोजी सकाळीच जी. बी. पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे जनरल सेक्रेटरी कॉ. सुधाकर रेड्डी,कॉ. डी. राजा, कॉ.अतुल अंजान यांचेसह राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनीही भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एक जाणते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले कॉ. बर्धन. त्यांचा चाहता वर्ग विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटनामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ते सर्वांना हवे हवेसे वाटतात. भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिल चे सचिव कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुकुमार दामले, कॉ. सुभाष लांडे, कॉ. तुकाराम भस्मे, आयटकचे राज्य सेक्रेटरी श्याम काळे, पक्षाचे केंद्रीय सचिव मंडळ व केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते पुन्हा पक्ष कार्यात सहभागी होतील असा आशावाद युवक, विद्यार्थी, आणि असंख्य जनमानस व्यक्त करत आहे.

पुन्हा मुख्य पानावर