Communist Party Of India Maharashtra State council

राज्यव्यापी चळवळ

कॉ. गोविंद पानसरे संबोधित करताना सर्वांना पेन्शन,सामाजिक सुरक्षा आंदोलन.

२० वे राष्ट्रीय अधिवेशन

२० वे राष्ट्रीय अधिवेशनासाठी उपस्थित जनसमुदाय

भाकप चे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.सुधाकर रेड्डी मुंबई दौरा

भाकप चे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.सुधाकर रेड्डी सामाजिक सुरक्षा,सर्वांना पेन्शन आंदोलनास संबोधित करण्यास आले असता त्यांचे स्वागत करताना राज्य सचिव कॉ.भालचंद्र कांगो,कॉ.प्रकाश रेड्डी

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील रणरागिणी कॉ.तारा रेड्डी ,कॉ.अहिल्या रांगणेकर आणि इतर महिला कार्यकर्त्या.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागी कम्युनिस्ट आंदोलकांसह संत गाडगे बाबा,सेनापती बापट आणि इतर कार्यकर्ते.

राष्ट्रीय अधिवेशन उपस्थित जनसमुदाय

लाल बावटा कलापथक

अवघ्या महाराष्ट्रात आपल्या शाहीरीने चळवळीला प्रवृत्त करणारे शाहीर कॉ अण्णाभाऊ साठे,कॉ.अमर शेख, कॉ. शाहीर गवाणकर

सर्वांना पेन्शन,सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन .

सर्वांना पेन्शन,सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आझाद मैदानात उतरलेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जमलेला आंदोलक समुदाय

अखिल भारतीय आयटक अधिवेशन मुंबई.

कॉ. ए.बी.बर्धन मुंबई येथील आयटक अधिवेशनात मार्गदर्शन करताना

अखिल भारतीय आयटक अधिवेशन मुंबई.

मुंबई अधिवेशनात मार्गदर्शन करताना आयटकचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार कॉ. गुरुदास दासगुप्ता

अखिल भारतीय आयटक अधिवेशन मुंबई.

मुंबई अधिवेशनात मार्गदर्शन करताना आयटकचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कॉ.सुकुमार दामले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेचा इतिहास

भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेमागील तीन प्रेरणा

१.१९२०-१९२२ च्या काळातील राष्ट्रीय ठराव
२.नव्याने विकसित होणारे कामगार
३.रशियन समाजवादी क्रांति

सुरवातीचा काळ: गटांपासून राजकीय पक्ष स्थापनेपर्यंत ऑक्टोबर क्रांतीचा व्यापक परिणाम होता. प्रसारमाध्यमांचा अभाव आणि सत्ताधार्‍यांची बंधने असतानाहीक्रांतीबद्दल कुतूहल,उत्सुकता,आस्था होती. खुद्द केसरीतून लोकमान्य टिळक आणि लाला लाजपतराय या राष्ट्रीय नेत्यांनी बोल्शेविक क्रांति उचलून धरली.
१९२० मध्ये तुर्कस्तानचा सुलतान जो भारतीय मुस्लिमांचा खलिफा होता. त्याला इंग्रजांनी पदच्युत केल्यावर मुजाहिदांचा फार मोठा गट काबुलला रवाना झाला व तेथून सोवियत यूनियन मध्ये गेला. अशा गटाची पहिली बैठक ताश्कंद येथे १९२१ मध्ये झाली. या बैठकीला एम.एन.रॉय उपस्थित होते. भारतात त्यावेळी कम्युनिस्ट विचारांचे छोटे छोटे गट कार्यरत होते. एप्रिल १९२१ मध्ये "गांधी विरुद्ध लेनिन" हे छोटेखानी पुस्तक कॉ. डांगे यांनी लिहून मुंबई,कोलकाता,मद्रास लाहौर,कानपुर येथे प्रसिद्ध केले.वैचारिक मंथनाच्या युगात या पुस्तकाने मोलाची कामगिरी केली. त्यानंतर ऑगस्ट १९२२ मध्ये कॉ. डांगे यांनी " सोशलिस्ट " हे साप्ताहिक सुरू केले. कम्युनिस्ट विचारांचा प्रसार करणारे हे हिंदुस्थानातील पहिले साप्ताहिक. त्यामुळे मुंबई प्रांतात कॉ. डांगे यांच्याभोवती एक गट तरुण कम्युनिस्टांचा तयार झाला. कॉ. डांगे,कॉ. पर्वते, कॉ. जोगळेकर,कॉ. घाटे, कॉ. मिरजकर इ.
तसेच गट लाहौर,मद्रास,कोलकाता,कानपुर, येथे तयार होत गेले. व्यापक कायदेशीर पक्ष स्थापन करावा,कम्युनिस्ट पक्षाची गुप्त संघटना तयार करावी ह्याबद्दल एकवाक्यता होती.
१९२३ साली कॉ.सिंगारवेलू यांनी पहिला मे दिन साजरा केला. व लेबर किसान पार्टीची घोषणा केली. कॉ. डांगे यांना निमंत्रण होते पण ते हजार राहू शकले नाहीत. परंतु नंतर 'सोशलिस्ट' मध्ये आपल्या सर्व चळवळींचा उल्लेख या पक्षाच्या नावाने करायला सुरुवात केली. पक्ष स्थापन झाल्यावरही विखुरलेल्या कम्युनिस्टांना एकत्र करून देशभर कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याचे काम होते. देशाबाहेर अशी परिषद व्हावी अशी रॉय यांची सूचना होती तथापि कॉ. डांगे व सिंगारवेलू याबाबत सहमत नव्हते. ब्रिटिश गुप्तहेर संघटनेची या गटांच्या हालचाळीवर कावळ्यासारखी बारीक नजर होती. म्हणूनच कॉ. डांगे, कॉ.शौकत उस्मानी, कॉ.सिंगारवेलू,कॉ. मुझफर अहमद,कॉ.गुलाम हुसेन,नलिनी गुप्ता इत्यादीवर कानपुर कटाचा खटला भरण्यात आला. फेब्रुवारी १९२४ मध्ये खटल्यानिमित्त नेत्यांच्या गाठीभेटी. कॉ.डांगे यांची कम्युनिस्ट पक्ष स्थापन करावा अशी उघड सूचना. कानपूरमधील पत्रकार सत्यभक्त यांनी परिषद घेण्याचे जाहीर केले. २६,२७,२८,डिसेंबर १९२५ कानपुर येथे "कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया" रीतसर स्थापना. कॉ.सिंगारवेलू अध्यक्ष,हसरत मोहानी स्वागताध्यक्ष,कॉ.घाटे सरचिटणीस तर कॉ.डांगे आणि शौकत उस्मानी तुरुंगात हाते.